कोरोना साथीच्या काळात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश !
साथरोगाच्या काळात सामान्य नागरिकांना आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व महापालिकेवर असतांना त्या पुरवू न शकणे हा अक्षम्य अपराध आहे. यासाठी पालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना शोधून कार्यवाही करायला हवी.
पुणे – कोरोना साथीच्या काळात उपचारासाठी सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागले. महापालिकेच्या रुग्णालयात विनामूल्य पडताळणीची सुविधा असली, तरी तेथील व्यवस्था सुलभ नव्हती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचा व्यय आवाक्याबाहेर गेला. महापालिकेने आरोग्य व्यवस्था सज्ज न ठेवल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. त्यामुळे महापालिकेचा कर नियमित भरूनही आरोग्याच्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याविषयी अनेकांनी खेद व्यक्त केला. महापालिकेचे २०२१ -२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने सादर केले, त्यावर नागरिकांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.