तलवारीने केक कापल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह ४ धर्मांधांना अटक आणि जामीन
केवळ वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकरणांना आळा बसेल.
सोलापूर – वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांना अटक करण्यात आली आणि त्यांना जामीन संमत झाला. माजी नगरसेवक नसीम बशीर बागवान खलिफा, आरिफ मजीद बागवान, सत्तार मोद्दीनसाब शेख, इस्माईल इब्राहीम बागवान यांच्यावर २६ जानेवारी या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला. ४ जानेवारी या दिवशी माजी नगरसेवक नसीम बशीर बागवान खलिफा यांच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापण्यात आला होता.
याविषयीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर २७ जानेवारी या दिवशी ही कारवाई करण्यात आली.