प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा
कुडाळ – प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा ३१ जानेवारीला भक्ताच्या उपस्थितीत आणि प प.पू राऊळ महाराज यांच्या जयजयकारात, प.पू. राऊळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसाद अन् अखंड महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.
या निमित्ताने पहाटे काकड आरती, सकाळी ६ वाजता श्री. प.पू. स. स. राऊळ महाराज समाधी स्थानी अभिषेक आणि एकादशणी, सकाळी १० वाजता प. पू. श्री विनायक ( अण्णा) राऊळ महाराज यांची असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी श्रींची महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी १ वाजता भावई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी श्री प. पू. स. समर्थ राऊळ महाराज भजन मंडळ, राऊळवाडी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी श्री प. पू. राऊळ महाराज महिला भजन मंडळ, राऊळवाडी यांचे सुश्राव्य भजन (सादरकर्त्या सौ. सुनंदा अशोक पवार आणि राऊळ महाराज परिवार महिला मंडळ), सायंकाळी श्रींची सांजआरती आणि पालखी मिरवणूक सोहळा प.पू. स. स. राऊळ महाराज समाधीस्थान जन्मस्थानापर्यंत काढण्यात आला. या वेळी प.पू. समर्थ राऊळ महाराज आणि प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या जयजयकाराने अन् ढोलताशांच्या गजरात पिंगुळी नगरी दुमदुमून गेली. रात्री श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा दशावतारी ‘देवदत्त गीतांजली’ हा नाटयप्रयोग सादर करण्यात आला. या वेळी मठात आलेल्या भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने प.पू. समर्थ राऊळ महाराज आणि प.पू अण्णा राऊळ महाराज यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. या सर्व कार्यक्रमांवर प.पू. अण्णा राऊळ महाराज हे स्वतः लक्ष ठेवून होते. कोरोना महामारीमुळे या वर्षीचा उत्सव सोहळा हा शासनाच्या नियमांचे पालन करून करण्यात आला. सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर , मास्क यांचे काटेकोर पालन करूनच भक्तांना कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जात होता.