वणीच्या आरोग्य विभागात अत्यल्प कर्मचारी
प्रशासनातील रिक्त जागा भरण्यात काय अडचण आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे. आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नसणे म्हणजे जनतेच्या जिवाशीच खेळण्यासारखे नाही का ?
वणी (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत; मात्र अल्प कर्मचार्यांमुळे पूर्ण आरोग्य विभागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या ४ आरोग्य केंद्रात ९६ कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महामारीच्या काळात एवढ्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या सेवा कशा मिळत असतील ?, असा प्रश्न आहे.