पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !
ग्राहकांना विशेष सवलतीच्या दरात उत्पादने उपलब्ध
ठाणे – अभिनव आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणार्या ‘पितांबरी’ची १६५ वेगवेगळ्या पॅकिंगमधील ८२ हून अधिक उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या उत्पादनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘पितांबरी’चं फिरतं दुकान’ असा अभिनव उपक्रम पितांबरीने चालू केला आहे. या उपक्रमामुळे कोकणातील नागरिकांना सवलतीच्या दरात पितांबरीची सर्वच उत्पादने उपलब्ध होणार आहेत. पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते पितांबरी तळवडे ब्रँच येथे ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पितांबरीकडून ‘पितांबरी ग्राहक मंच’ आणि ‘पितांबरी शॉपी फ्रँचायसी’ या योजना महाराष्ट्रात राबवल्या जात आहेत.
‘गावोगावी भरवल्या जाणार्या आठवडी बाजारात ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ म्हणजेच ‘मोबाईल व्हॅन’ असल्यास अनेकांना पितांबरीची दर्जेदार आणि दैनंदिन जीवनात अत्यावश्यक ठरणारी सर्वच उत्पादने विकत घेता येऊ शकतील. मोबाईल व्हॅनमधील आमचा प्रवक्ता या उत्पादनांची माहितीही देईल. ग्राहकांना विशेष सवलतीच्या दरात उत्पादने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा’, असे आवाहन रवींद्र प्रभुदेसाई यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
या वेळी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या पत्नी सौ. वृषाली प्रभुदेसाई, पितांबरीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तुषार हळदणकर, बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रदीप प्रभुदेसाई उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात ही व्हॅन रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये फिरणार आहे. आपल्याला आपल्या गावात ‘पितांबरीचे फिरतं दुकान’ ही सुविधा हवी असल्यास पितांबरीच्या प्रतिनिधीशी ९४०३३६३३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.