हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये प्रबोधन अन् प्रशासनाला निवेदन
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ
धनबाद (झारखंड) – येथील बीएस्एस् महिला उच्च विद्यालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर प्रबोधन केेले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रध्वजाचा वापर खेळण्यासाठी न करणे, तोंडवळ्यावर किंवा कपड्यांवर तिरंग्याच्या रंगांचा उपयोग न करणे आणि राष्ट्रगीत अयोग्य वेळी अन् अयोग्य ठिकाणी म्हणणार नाही’, अशा प्रकारची प्रतिज्ञा करण्यास सांगितले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, तसेच समितीचे श्री. अमरजीत प्रसाद आणि सौ. मोना प्रसाद आदी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी निवेदन सादर
१. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री होऊ नये, यासाठी धनबादच्या उपायुक्तांना निवेदन देतांना ‘तरुण हिंदु’ संघटनेचे श्री. बप्पा सरकार आणि समितीचे श्री. अमरजीत प्रसाद उपस्थित होते.
२. राष्ट्रध्वजाचा मान राखावा, यासाठी कतरास (झारखंड) येथे समितीचे सर्वश्री सुरेंद्र चौधरी, प्रताप वर्मा आणि युवा धर्माभिमानी दीपक केसरी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले.
३. धर्माभिमानी अधिवक्ता गोरा चंद मलिक यांनी हुगळी (बंगाल) पोलिसांना निवेदन दिले.
४. समितीचे श्री. अमित बर्मन आणि धर्माभिमानी श्री. विशाल कुंडू यांनी दुभडी (आसाम) क्षेत्रातील पोलीस अधीक्षक आनंद मिश्रा, जिल्हा आयुक्त अनंत लाल ज्ञानी यांना निवेदन दिले.