गोव्यातही लव्ह जिहाद

केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांमधून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी उत्तरप्रदेशसह काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदे केले. लव्ह जिहादचे असे प्रकार आता शांतताप्रिय गोव्यातही समोर येऊ लागले आहेत. मागील आठवड्यात फातोर्ड्याजवळील चंद्रवाडा येथील मुसलमान वस्तीत रहाणार्‍या मौलवी अब्दुल देवगिरी या १९ वर्षांच्या युवकाने १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण केल्याची तक्रार मडगाव पोलीस ठाण्यात एका मुलीच्या भावाने प्रविष्ट केली.

गोव्यात लव्ह जिहादची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही घटना न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एका घटस्फोटित महिलेने पुनर्विवाहासाठी गोव्यातील वधू-वर सूचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच संकेतस्थळावरून उत्तरप्रदेशच्या आझमगड येथील अफ्ताब अहमद मिर्जा या ४७ वर्षीय विवाहित पुरुषाने समीर कपूर असे हिंदु नाव धारण करून विधूर असल्याचे भासवून तिच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सअ‍ॅपवरून त्याने तिच्याशी मैत्रीही जुळवली. लग्नाचे आमीष दाखवले. त्यानंतर ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी तो गोव्यात पोचला. महिलेला अंगठी घातली आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. नंतर विवाह करण्याऐवजी त्याने तिच्या भावाला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून पैशांची मागणी केली. सध्या हे प्रकरण पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ही दोन उदाहरणे म्हणजे हिमनगाचे टोक आहे. काही घटनांची तर वाच्यताही केली जात नाही.

गोव्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही धर्मांध संघटना मडगाव येथे कार्यरत आहे. याच भागांतून अनेक हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. त्यांचे अपहरण होत आहे. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. म्हणूनच प्रथम या संघटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, तसेच अशा धर्मांधांपासून मुलींना वाचवण्यासाठी घराघरांतून धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे, तरच अशा घटनांना आळा बसेल !

– सौ. समृद्धी गरुड, पर्वरी, गोवा.