सुकूर येथे पश्चिम बंगालस्थित धर्मांधाकडून १० वर्षीय मुलीचा विनयभंग
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत आणि वासनांधतेत बहुसंख्य असलेले धर्मांध !
म्हापसा, ३० जानेवारी (वार्ता.) – सुकूर, आरडी येथे एका अल्पवयीन मुलीचा पश्चिम बंगालस्थित आरोपी महंमद याने विनयभंग केला. गोव्यातून पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पर्वरी पोलिसांनी आरोपी महंमद याला शिताफीने कह्यात घेतले. आरोपी महंमद याला जिल्हाधिकार्यांसमोर उपस्थित केला असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालस्थित आरोपी महंमद हा व्यवसायाने फरशी बसवणारा आहे. आरोपी महंमद सुकूर, आरडी येथे एका बंगल्यात फरशी बसवण्यासाठी गेला होता. या वेळी त्याची नजर घरमालकाच्या १० वर्षीय मुलीवर पडली. आजूबाजूला कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर त्याने तो पतीला सांगितला. याविषयी पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यावर पोलिसांनी आरोपी महंमद याला बाल गुन्हा कायद्यांतर्गत कह्यात घेतले.