‘नोकरी प्रामाणिकपणे आणि साधना केल्यामुळे देवाने साधकाला साहाय्य केल्याविषयी आलेली प्रचीती !
‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे. त्यामुळे त्यांना आस्थापनाच्या मालकाने ‘आदर्श कामगार पुरस्कार’ प्रदान केला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांनी पूर्णवेळ साधनेसाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर आस्थापनाच्या मालकाने त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आस्थापनामध्ये (कंपनीत) काम करण्यासाठी थांबा. काही काम नाही केले, तरी चालेल. केवळ आस्थापनात या.’’ ते सेवेमुळे तिथे जाऊ शकत नव्हते, तर त्या आस्थापनाच्या मालकाने ‘त्यांना खर्च करण्यासाठी पैसे मिळावेत’, यासाठी त्यांना १० टक्के वेतन चालू ठेवले. ‘त्यानंतर काही मासांनी दिवाळीत खर्च करण्यासाठी त्यांना पैसे न्यून पडत असतील’, असे आस्थापनाच्या मालकाला वाटले; म्हणून त्यांनी २ सहस्र रुपये वेतन वाढवले. त्याच मासात त्या साधकाच्या आईला फुप्फुसांचा त्रास चालू झाला. त्यामुळे त्यांना महिन्याला २ सहस्र रुपयांची औषधे लागत होती. ‘साधना केल्यामुळे देव साधकांना कसे साहाय्य करतो ?’, याचे हे एक जिवंत उदाहरणच आहे’, असे वाटले.’
– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३१.१२.२०२०)