पुणे येथील ‘ऑनलाईन’ ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस; हिंजवडी पोलिसांची कारवाई
हिंजवडी (पुणे) – ‘ऑनलाईन’ माध्यमातून गिर्हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे.
या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य २ साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींकडून १ चारचाकी, भ्रमणभाष असा एकूण ४ लाख १० सहस्र रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याविषयी पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी तक्रार दिली आहे.