मुंबईसह पुण्यात सतर्कतेची चेतावणी
मुंबई – देहलीमध्ये बाँबस्फोट झाल्यानंतर सरकारने मुंबई आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. देहली आणि मुंबई येथील विमानतळ, तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा केली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन अजित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे.
सरकारच्या सूचनांनुसार ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने’ही (‘सी.आय.एस्.एफ्.’ने) सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने आणि शासकीय इमारती यांच्यासाठी सतर्कता घोषित केली आहे.