पाकमधील १२६ वर्षे जुने असलेले शिवमंदिर डागडुजीनंतर भाविकांसाठी खुले !
पाकमधील हिंदूंविषयी सहानुभूती आहे; म्हणून नव्हे, तर आंतराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा ‘अल्पसंख्यांकांचा धार्मिक भावना जपणारा’, अशी करण्यासाठीच पाक हे सर्व करत आहे. पाकला खरोखरंच तेथील हिंदूंविषयी काही तरी वाटत असेल, तर त्याने प्रथम तेथील हिंदु युवतींचे बळजोरीने होणारे धर्मांतर आणि हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवायला हवेत !
लाहोर – पाकमधील १२६ वर्षे पुरातन असलेल्या शिवमंदिराची डागडुजी पूर्ण झाली असून ते आता भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. या मंदिराचे व्यवस्थापन स्थानिक हिंदु संघटनेकडे सोपवण्यात आले आहे. ‘पाकमधील साधारण १२ हून अधिक मंदिरांचे पुनरुत्थान केले आहे. त्यामध्ये सियालकोट येथील १ सहस्र वर्षे जुने असलेले शावला तेजा मंदिराचा समावेश आहे. पेशावर येथील मंदिरांची डागडुजी चालू आहे’, अशी माहिती ‘इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’चे प्रवक्ते आमीर हाशमी यांनी दिली.