शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली ! – महालेखापालांचे ताशेरे
पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात (लक्झरी टॅक्स) नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली. ही माहिती ‘कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग) यांच्या ‘ऑडिट’ अहवालात नमूद केली आहे. ‘कॅग’ने हा ‘ऑडिट’ अहवाल २९ जानेवारी या दिवशी विधानसभेत मांडला आहे.
‘कॅग’ अहवालात पुढे म्हटले आहे की, ‘‘वर्ष २०१६-१७ मध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय बांधकामासाठी निविदा निश्चित करण्यासाठी विलंब केल्याने औषध खरेदी करण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपये अतिरिक्त खर्च करावे लागले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या आंतरिक प्रशासनावर नियंत्रण नसल्याने ‘रिसिप्ट’मध्ये लाखो रुपयांचा गैरप्रकार झाला आहे.’’ (शासनाने या सर्व गोष्टींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, तरच महालेखापालांच्या अहवालाची काहीतरी फलनिष्पत्ती निघेल ! – संपादक)