मधमाशांचे पोळे बनवण्याच्या खोक्यांचे शेतकर्यांना वितरण
पणजी – मधाच्या निर्मितीसाठी शेतकर्यांना मधमाशांचे पोळे बनवण्याच्या खोक्यांचे वितरण केले जाते. गोवा खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाने उत्तर गोवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहयोगाने एका विशेष सोहळ्याद्वारे जुने गोवे येथील कृषी क्षेत्रात सांताक्रूझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांच्या हस्ते मधमाशांचे पोळे बनवण्याच्या १०० खोक्यांचे वितरण केले. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गोवा खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाने या मधनिर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मधमाशांचे पोळे बनवण्याची खोकी विकत घेण्यासाठी ९० ते ९५ टक्के अनुदान घोषित केले आहे.