राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ‘दळणवळण बंदी’ कायम रहाणार ! – शासनाचा निर्णय
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘दळणवळण बंदी’मध्ये सतत मुदतवाढ दिली जात आहे. देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाकडून झोनमधील ‘दळणवळण बंदी’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार राज्यातील ‘कंटेनमेंट झोन’मध्ये येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. शासनाने याविषयी परिपत्रक काढले आहे. आतापर्यंत अनुमती देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टी चालू रहाणार आहेत. ज्या सेवांना अनुमती देण्यात आलेली नाही, त्या यानंतरही बंदच रहाणार आहेत.