लोणंद (जिल्हा सातारा) येथे अज्ञात वाहनाने ३ जणांना चिरडले !
२ ठार, तर १ गंभीर घायाळ
सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ २८ जानेवारीला सकाळी ६ वाजता एकाच कुटुंबातील सदस्य फिरायला निघाले होते. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २ जण जागीच ठार झाले, तर १ जण गंभीर घायाळ झाला आहे. मृतात पती-पत्नीचा समावेश असून गंभीर घायाळ झालेली त्यांचीच सून आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.