हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांना आलेल्या अनुभूती

१. प्रसारसेवा करतांना घडणार्‍या गोष्टींची पूर्वसूचना मिळणे आणि मनात आलेल्या विचारांप्रमाणे घडणे

श्री. सुनील घनवट

गेल्या ३ मासांपासून प्रसारसेवेत संपर्काला जातांना हा संपर्क करतांना प्रतिसाद सकारात्मक मिळेल कि नकारात्मक ?, हे देवाच्या कृपेने मला आधीच समजत होते. त्या वेळी माझ्या मनात जे विचार येत होते, त्याप्रमाणेच घडत होते. एखाद्या ठिकाणी नकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विचार आल्यावर तिथे त्याप्रमाणेच घडत होते. गुरुदेव आपला वेळ वाचावा; म्हणून आधीच सुचवून आपली काळजी घेत आहेत, असा विचार मनात येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

१ अ. संपर्काला जातांना ही व्यक्ती चांगली असणार, असा विचार येणे आणि प्रत्यक्षातही तिच्याकडून चांगला प्रतिसाद मिळून ती कार्याशी जोडली जाणे : संभाजीनगर येथे एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वरिष्ठ संपादकांना भेटायला जाण्यापूर्वी ही व्यक्ती चांगली असणार. आपण त्यांना भेटायला उशीर केला, असा विचार माझ्या मनात येत होता. प्रत्यक्षात त्यांना भेटल्यावर पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या वेळी त्यांनी सांगितले, मी ६ मासांत पूर्णवेळ धर्मकार्य चालू करणार आहे. १४ जिल्ह्यांत आमचे कार्य चालते. तुमच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. समितीचे कार्य समजून घेऊन त्यांनी इतर जिल्ह्यांतील चांगले संपर्कही दिले. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही कधीही या. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. हे सर्व देवाच्या कृपेने माझ्या ध्यानात आले.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२३.६.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक