(म्हणे) ‘तैवानने स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा अर्थ युद्ध !’- चीनची धमकी
चीनचे त्याच्या शेजारी असणार्या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !
बीजिंग (चीन) – तैवानकडून स्वातंत्र्याच्या घोषणेची सिद्धता होत असल्यावरून चीनने युद्ध करण्याची धमकी दिली आहे. चीन तैवानला त्याचा भाग सांगत आहे.
#China toughened its language towards #Taiwan, warning after recent stepped up military activities near the island that “independence means war” and that its armed forces were acting in response to provocation and foreign interference https://t.co/7QhQyvq7xg
— The Daily Star (@dailystarnews) January 28, 2021
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान यांनी म्हटले, ‘तैवानमधील मूठभर लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.
(सौजन्य : South China Morning Post)
आम्ही स्वातंत्र्याची मागणी करणार्या त्या लोकांना चेतावणी देत आहोत की, आगीशी खेळल्यास ते स्वतः जळून जातील आणि तैवानच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे युद्ध !’