देहलीत हिंसा करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची मोर्च्याद्वारे मागणी
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात या मागणीसाठी २७ जानेवारी या दिवशी ईश्वरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.