एस्.टी. रस्त्यावर अडवून सरकारी कर्मचार्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्ववादी संघटना
• सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध !
• अशी मागणी का करावी लागते ? |
नाशिक – संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या एस्.टी. बसवर संभाजीनगर अशी पाटी असल्याचे पाहून स्थानिक धर्मांधांनी ती बस अडवून हैदोस घातला. त्या धर्मांधांनी बसचे चालक आणि वाहक यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी धर्मांधांनी शिवीगाळही केला. जिल्ह्यातील औरंगाबाद समाचार या स्थानिक वृत्तवाहिनीने या घटनेची एक ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली होती. याच घटनेचा निषेध करत जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारी कामात अडथळा आणणार्या धर्मांधांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याच्या परिवहन मंत्र्यांना केली.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिले. या वेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष श्रीराम सिंग बावरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल पाटील, हिंदू योद्धा संघटनेचे प्रांजल देव, विश्व हिंदु परिषदेचे नीलेश वाडील, जय हिंद धर्मरक्षक संघाचे उदय उपासनी, सनातन संस्थेचे श्री. नीलेश भाई, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे सागर देशमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. छबु मोहिरे, हिंदुराष्ट्र सेनेचे नीलेश साळुंखे उपस्थित होते.