निसर्गातील विविध चमत्कार
१. ‘अॅबिसिनीयाचा (Asclepious) हा प्रचंड वृक्ष ! त्याच्या पानातून अखंड दुधासारखा द्रव गळत असतो. त्याचा दुरून जरी डोळ्यांशी संपर्क आला, तरी माणूस आंधळा होतो. कितीतरी लाकूडतोडे त्यामुळे आंधळे झाले आहेत.
२. मेक्सिन राज्यात आढळणारे दुराचारी स्त्री वृक्ष (Tree of bad woman) ! या वृक्षाला केवळ स्पर्श केला, तरी न्यूमोनिया होतो, कातडीचे रोग होतात. आधुनिक वैद्यकालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. ते रोग बरे करता येत नाहीत.
३. वेस्ट इंडीज बेटातील मँचिनील (Manchineel) वृक्ष ! यातून रस गळतो. त्याला स्पर्श होताच माणूस आंधळा होतो. एवढेच नव्हे, तर त्याच्या शेकोटीजवळ बसणारा अंध होतो.
४. मेक्सिकोतील डायनामाईट (Dynamite) वृक्ष ! याला सोन्यासारखी शेकडो फळे लागतात. पूर्ण पिकले की, त्याचा भयंकर स्फोट होतो. २० फुटांच्या परिसरात येणारा विलक्षण घायाळ होतो.
५. वेस्ट इंडीज बेटात गाणारे एक झाड आहे. पाण्यातील तो वृक्ष अत्यंत विषादग्रस्त उद्विग्न कण्हतो आणि ते ऐकणार्याला भय वाटते.
६. वेस्ट इंडीज बेटात हत्ती वृक्ष आहेत. हत्तीसारख्या दिसणार्या वृक्षातून दुर्गंधीयुक्त रक्त गळते.
७. अॅमेझॉनच्या जंगलात ‘राक्षसी गाय वृक्ष’ आहे. त्यातून दुधासारखा पांढरा विषारी पदार्थ स्रवतो. तो दृष्टीस पडला, तरी आजार उद्भवतात.
८. वेस्ट इंडीज बेटात अशा अनेक वृक्षांची जंगले काही मैल लांबीच्या गुहांतून आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियातील काही निर्जन स्थळे या ठिकाणी असे वृक्ष आहेत की, कल्पनेतल्या भूताटकीपेक्षाही सत्य आहेत. त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, असे भयंकर वृक्ष आहेत. असंख्य वृक्ष-चमत्कारातील ही थोडीशी उदाहरणे आहेत. वृक्षच नव्हे, तर पाषाण, पर्वत, भूमी, पाणी आणि वारा अशा निसर्गातील कितीतरी क्षेत्रात असे ‘नाईट मार्स’ (भयावह स्वप्ने) आहेत.’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)