पुण्यातील सोनित सिसोलेकर प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानीत
पुणे – येथील पॅराडाईज इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणार्या सोनित सिसोलेकर याने नासाच्या एका स्पर्धेत मंगळ ग्रहावरील माती लाल का झाली ?, यासंबंधी संशोधन सादर केले. त्याच्या विज्ञानातील सातत्यपूर्ण कामगिरीतून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच त्याला इतर स्पर्धांमध्ये राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकही मिळाले आहे. आठवीत शिकणार्या सोनितने इंडियन नॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअरमध्ये झाडांच्या वाढीत आवाजाचा काय परिणाम होतो, यावर संशोधन केले होते.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याची बाल शक्ती पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. @collectorpune1 डॉ. राजेश देशमुख यांनी सिनोत सिसोलेकर या बालकाचा बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड झालेबद्दल सत्कार केला. pic.twitter.com/tfqAoRPgFn
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) January 27, 2021
सध्या तो पुण्यातील आणि दख्खनच्या पठारावरील लाव्हा ट्यूब या विषयावर संशोधन करीत आहे. कोरोनामुळे देहलीत कार्यक्रम होऊ शकला नाही; पण पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यामुळे मी प्रेरित झालो असून भविष्यात संशोधन क्षेत्रात पुढे जायचे आहे, असे त्याने सांगितले.