इंदिरा गांधींनी भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्याच्या अट्टाहासापोटी ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतच पालट केला होता
इंदिरा गांधींनी भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्याच्या अट्टाहासापोटी ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतच पालट केला होता, हे ‘संविधान बचाव आंदोलनवाले’ यांना ठाऊक आहे का ?
‘२६.११.१९४९ या दिवशी घटना समितीने स्वीकारलेल्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत ‘आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक निर्माण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक ठरवू आणि भारतातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसंबंधी शाश्वती देण्याचे ठरवून ही घटना मान्य करत आहोत अन् त्यासंबंधी कायदा करून ती स्वीकारत आहोत’, असे म्हटले होते. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधींनी ४२ व्या घटना दुरुस्तीत ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ याऐवजी ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत (धर्मनिरपेक्ष) लोकशाही गणराज्य’ अशी शब्दयोजना करण्यात आली.’
– मुनेश पुणेकर (‘दैनिक सकाळ’, २.१२.१९९८)