भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
भाववृद्धी सत्संगातील भाव साधकांत रुजू दे ।
वृक्ष त्याचा होण्यासाठी नामजपाचे कुंपण वाढू दे ॥ १ ॥
भाववृद्धी सत्संगातील गोष्टी साधकांना कळू देत ।
कृती, वृत्ती, भाव शुद्ध होण्यास अंतर्मुखता वाढू दे ॥ २ ॥
भाववृद्धी सत्संगातील भाव टिकून राहून तो वाढू दे ।
सर्वांपर्यंत भावरूपी प्रसाद पाठवण्याची बुद्धी दे ॥ ३ ॥
या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥ ४ ॥
साधकांच्या बुद्धीवरील अंधःकार संपवून प्रकाश दे ।
प्रकाशाची पणती तेवत राहण्यासाठी, स्वभावदोष आणि अहंकार जाऊ दे ॥
– सौ. अर्चना मराठे, वाळपई, गोवा. (३.८.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |