श्री. अनिकेत जमदाडे यांना रामनाथी आश्रमात एकाच दिवशी झालेल्या दोन भाववृद्धी सत्संगांत आलेल्या अनुभूती
१. पहिला भाववृद्धी सत्संग
अ. ‘सकाळी १० वाजता भाववृद्धी सत्संग आहे’, असा निरोप मला मिळाला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटत होती.
आ. सत्संगासाठी सभागृहात आल्यावर मला आनंद जाणवत होता. डोळे बंद केल्यावर सर्वत्र गुलाबी रंग दिसत होता. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते अन् माझा भावही जागृत होत होता.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) बोलत असतांना अधूनमधून सुगंध येत होता आणि चांगले वाटत होते.
ई. मला मधे-मधे त्रासही जाणवत होता आणि माझ्या डोक्याची उजवी बाजू दुखत होती.
उ. भावार्चना चालू असतांना डोळे बंद केल्यावर मला पिवळा प्रकाश दिसला आणि ‘भावलहरी’ जाणवत होत्या.
ऊ. सत्संगामध्ये साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित होत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझा भाव जागृत झाला.
ए. सत्संगात शेवटी कु. मधुरा भोसले यांनी त्यांचे मनोगत सांगितल्यावर मला मोगर्याचा सुगंध येत होता.
२. दुसरा भाववृद्धी सत्संग
अ. भाववृद्धी सत्संग चालू असतांना ‘वातावरण स्थिर झाले असून सर्व सृष्टी सत्संगात स्थिर झाली आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला चैतन्य मिळत होते.
आ. साधक स्वतःचे साधनेचे प्रयत्न सांगत होते. तेव्हा मला भावाची वलये जाणवत होती.
इ. मधे-मधे माझे डोके जड झाल्यासारखे वाटत होते.
ई. सत्संगामध्ये सत्संग घेणार्या साधिका बोलत असतांना पिवळे तरंग दिसत होते.
‘परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने हे अनुभवायला मिळाले’, याविषयी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अनिकेत जमदाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |