गायत्री मंत्राचा जप केल्यावर श्वास घेण्यासंबंधी होणारा त्रास पूर्णतः दूर होणे
‘मला दोन मासांपासून श्वास घेण्यासाठी थोडा त्रास होत होता. आरंभी मी काही औषधोपचार केले; पण माझा त्रास दूर झाला नाही. ऑगस्ट २०२० मध्ये मी ‘कोरोना’च्या काळात आत्मबळ वाढण्यासाठी म्हणून प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा गायत्री मंत्राचा जप चालू केला. तेव्हा माझा हा त्रास ९० टक्के दूर झाला. मी काही दिवस हा मंत्रजप बंद केल्यावर मला पुन्हा श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मी पुन्हा पूर्वीप्रमाणे गायत्री मंत्राचा जप चालू केला. आता माझा श्वास घेण्यासंबंधी त्रास पूर्णतः दूर होऊन मला अतिशय बरे वाटत आहे.’ – कु. पूर्णिमा शर्मा, देहली (१५.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |