श्रीक्षेत्र मांढरदेव येथील श्री काळेश्वरीदेवीची महापूजा विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न
मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती
सातारा, २८ जानेवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र मांढरदेव जिल्हा सातारा येथील श्री काळेश्वरीदेवीची महापूजा विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावामध्ये पार पडली. प्रतिवर्षी पौष मासातील पौर्णिमेला ७ ते ८ लाख भाविक श्रीक्षेत्र मांढरदेव येथे भेट देतात; परंतु प्रशासनाने जमावबंदी आदेश काढल्यामुळे भाविकांच्या अनुपस्थितीमध्ये यात्रा पार पडली.
पहाटे ६ वाजता देवस्थानचे मुख्य विश्वस्त तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर्.डी. सावंत यांच्या हस्ते महापुजा पार पडली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष नंदीमठ, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.