विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ।
साधकांच्या हृदयस्थानी परात्पर गुरु डॉ. आठवले !
उठतांनाही तुम्हासी नयनी साधकजन दिसती ।
साधकजनही तुम्हास पहाण्या भावविभोर होती ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर
(टीप १) तुम्हासी ॥ १ ॥
अडचणी अन् बंधने गुरुदेवांना पहाण्यास असती ।
असता तुम्ही मंदिरी (टीप २) ।
मंदिराच्या आजूबाजूस जाण्यास बंधने साधकांस येती ।
म्हणूनी माऊली कधी कधी तुम्ही येता ।
साधकजनांसी ‘अच्छा’ करण्यासी ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ २ ॥
सर्व सोडून साधकजन (टीप ३) पूर्णवेळ झालो ।
तुमच्यामुळे गुरुमाऊली । एवढेच सांगावे वाटते ।
तुम्हाविण काही नको या अज्ञानी बालकांस माऊली ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ ३ ॥
तुमचे दर्शनही आता झाले आम्हा अमूल्य ।
कोणासाठी कशासाठी जगू ।
वाटे मनी हृदयी आम्हांसी ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ ४ ॥
दाटून कंठ येतो, शब्द गळून पडती ।
त्या वेळी कोणासी वाटे देहात अडकलो आम्ही ।
कोणी म्हणे स्थुलापेक्षा श्रेष्ठ आहे दृष्टीकोन ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ ५ ॥
माऊली, निर्गुण खोलीत बसतो उपायांसी ।
तरीही सगुण (संत) सहवास लाभला की,
अस्तित्वाची (टीप ४) । जाणीव होईल साधकांसी ।
कृतज्ञता व्यक्त करण्यास आमचे शब्द अपुरे पडती माऊली ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ ६ ॥
तुम्ही आतापर्यंत आम्हाला कसे आणले, किती केले आम्हासाठी ।
कसे होतो आणि आता कसे आहोत ।
या आठवणीतून जगत आहोत आम्ही ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥ ७ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – खोलीत
टीप ३ – म्हणजे साधक घरदार सर्व सोडून आश्रमात आले आहेत. (आमच्यात साधनेची ओढ निर्माण करून गुरुदेवांनीच आश्रमात आणले आहे.)
टीप ४ – स्वतःचे
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |