सर्वोच्च न्यायालयाकडून तांडव वेब सिरीच्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार
नवी देहली – वेब सिरीज तांडवचे निर्माता हिमांशू मेहरा, दिग्दर्शक अब्बास जफर, लेखक गौरव सोळंकी आणि अभिनेता मोहंमद झिशान अय्युब यांच्या अटकेला स्थगिती देण्याची ‘अॅमेझॉन इंडिया’ने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. तसेच या संदर्भातील सर्वांवरील खटल्यांची सुनावणी एकत्रित केली जाण्याविषयी नोटीस जारी केली. आता याविषयीची सुनावणी ४ आठवड्यांनंतर होणार आहे.