३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा
नवी देहली – येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे. तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेली आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान, असे मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.