आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।
सर्वत्र पसरली दहशत जैविक आक्रमणाची ।
मनात दाटली काळजी आप्त-स्वकियांची ॥ १ ॥
आम्हावरी कृपा करूनी संकट हे निवारा ।
हीच प्रार्थना तव चरणी हे गुरुराया ॥ २ ॥
नामजप करण्या शक्ती द्या ।
सकारात्मक कसे रहावे, हे तुम्हीच शिकवा ॥ ३ ॥
आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।
हीच प्रार्थना तव चरणी हे गुरुराया ॥ ४ ॥
– सौ. अनघा दीक्षित, बेळगाव (२१.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |