हिंदूंना कुठेच धर्मशिक्षण नसल्याने पुजारीही असेच वागतात !
दक्षिण आफ्रिकेतील हिंदु पुजारी अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क वसूल करत आहेत, जे योग्य नाही, अशी पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील हिंदु धर्म असोसिएशनचे सदस्य आणि डरबन येथील क्लेयर इस्टेट क्रिमेटोरियमचे व्यवस्थापक प्रदीप रामलाल यांनी सामाजिक माध्यमांत करून पुजार्यांकडून कोरोनाच्या काळात अधिक शुल्क घेण्याच्या कृतीचा विरोध केला आहे.