मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे ! – रामराजे नाईक-निंबाळकर

छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

रामराजे नाईक-निंबाळकर

पुणे – मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक विनियोग करून कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या वतीने डॉ. केदार फाळके लिखित छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, लेखक डॉ. केदार फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. नवीन पिढीसाठी अशा स्वरूपाच्या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखन होणे आवश्यक असल्याचे मत बलकवडे यांनी व्यक्त केले.