भ्रमणभाषमध्ये शोधून १३ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पालकांनो, भ्रमणभाषच्या होणार्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केवळ लाडापायी स्वतःच्या पाल्याच्या हाती सहस्रो रुपयांचे महागडे भ्रमणभाष द्यायचे कि नाही, ते वेळीच ठरवा !
जळगाव – भ्रमणभाषमध्ये एका संकेतस्थळावर स्वतःचा जन्मदिनांक घालून मृत्यू कधी आणि कसा होईल ?, हे पाहून येथील हर्षल कुंवर (वय १३ वर्षे) या विद्यार्थ्याने २६ जानेवारी या दिवशी दुपारी २ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
हर्षल इयत्ता आठवीत शिकत होता. कुटुंबीय घरात नसतांना त्याने गळफास घेतला. ते घरी परतल्यावर हर्षल त्यांना स्नानगृहात आढळला. त्याला रुग्णालयात नेले; पण वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. हर्षल एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हट्टापायी त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष हप्त्यावर घेऊन दिला होता. त्याचा भ्रमणभाष पोलिसांनी कह्यात घेतला आहे.