दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती
दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेले ऑनलाईन नामजप सत्संग आणि धर्मसंवाद पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती
१. श्री. विपिन कोशिक, गुरुग्राम, हरियाणा.
दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग ऐकल्यानंतर मनाला पुष्कळ शांती लाभणे, मन एकाग्र होऊन जीवन जगण्याच्या दृष्टीकोनात पालट होणे आणि नामजप करण्याची अन् स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची पद्धत जाणून घेऊन आचरणात आणल्याने पुष्कळ लाभ होणे : दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग ऐकल्यानंतर मला पुष्कळ शांती लाभली. माझे मन एकाग्र झाले आणि माझ्या जीवन जगण्याच्या दृष्टीकोनात पालट झाला. कोणतीही कृती करण्यापूर्वी ती करण्याचे शास्त्र सर्वांत प्रथम जाणून घेतले पाहिजे, असे ३ मासांच्या अनुभवानंतर मला जाणवते. असे केल्यावर आपण कोणतेही कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. नामजप करण्याच्या पद्धतीविषयी जाणून घेतल्यावर आणि आत्मसात केल्यानंतर मला पुष्कळ लाभ झाला. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची पद्धत जाणून घेतली अन् ती आचरणात आणल्यानंतर मला पुष्कळ लाभ झाला.
२. श्रीमती सुनीता गुप्ता, अलीगड, उत्तरप्रदेश.
दळणवळण बंदीमध्ये सत्संग लाभणे, कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी जप मिळणे अन् ऊर्जा मिळून मन शांत होणे : दळणवळण बंदीच्या काळात मला सत्संग लाभला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असीम कृपेमुळे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी जप मिळाला. मला ऊर्जा मिळून माझे मन पुष्कळ शांत रहात होते. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !
३. श्रीमती अनिता गुप्ता, अलीगड, उत्तरप्रदेश.
सर्वांची काळजी घेणारा ईश्वरच आहे आणि देवाला शरण गेल्यावर सर्व संकटे दूर होतात, असे सत्संग ऐकल्यानंतर वाटणे : दळणवळण बंदीच्या काळात मला सत्संग लाभला. सत्संग ऐकल्यानंतर मला वाटले, सर्वांची काळजी घेणारा ईश्वरच आहे. गुरुकृपेने सर्व शक्य होऊ शकते. आम्ही प्रतिदिन नामजप केला पाहिजे. देवाला शरण गेल्यावर सर्व संकटे दूर होतात.
४. श्री. विष्णु गुप्ता, अलीगड, उत्तरप्रदेश.
सत्संग ऐकल्यानंतर सकारात्मकता वाढणे : प्रतिदिन देवाचा नामजप केल्यावर सारी संकटे दूर होतात. नामजप केल्यावर कोरोनाचे भय दूर होते. सत्संग ऐकल्यानंतर सकारात्मकता वाढते आणि देव सर्वांची काळजी घेतो.
५. श्रीमती दर्शन गुप्ता, अलीगड, उत्तरप्रदेश. (साधकाचे नातेवाईक)
सत्संगामुळे मनुष्याच्या जीवनात पुष्कळ परिवर्तन होऊन चोहोबाजूंनी प्रभुकृपेचा वर्षाव होणे : सत्संगामुळे मनुष्याच्या जीवनात पुष्कळ परिवर्तन होते. त्याच्यावर चोहोबाजूंनी प्रभुकृपेचा वर्षाव होतो. मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते. हे प्रभु, मी आपल्याला शरण आले आहे. माझे त्रास दूर करावे, अशी मी प्रार्थना करते.
६. श्री. हरीश कपूर, नवी देहली
६ अ. दळणवळण बंदी लागू झाल्यानंतर मन पुष्कळ त्रस्त होणे; मात्र ऑनलाईन सत्संग चालू झाल्यावर घरातील वातावरण चैतन्यमय होणे आणि मनाला शांती अन् आनंद वाटणे : दळणवळण बंदी लागू झाल्यानंतर मी पुष्कळ त्रस्त होतो. मन अशांत आणि त्रस्त असतांना घर अन् कार्यालय कसे चालणार ? मी घरात काय करणार ?, असे मला वाटत होते; परंतु ऑनलाईन सत्संग चालू झाल्यावर सर्व काही पालटू लागले. आता वेळ कसा जातो ?, ते लक्षातच येत नाही. मला एक प्रकारची शांती आणि आनंद जाणवत आहे. प्रतिदिन सत्संग लाभल्याने घरातील वातावरण चैतन्यमय झाले. आता मी सत्संगाची प्रतीक्षा करतो.
६ आ. दळणवळण बंदीचा काळ आपत्काळ न वाटता साधनाकाळ झाला असणे : माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. दळणवळण बंदीचा काळ आपत्काळ न वाटता साधनाकाळ झाला आहे. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या कथांतून श्रीमन्नारायण सदैव आपल्या समवेत असून सर्व ताण दूर होतो, असे लक्षात येते.
६ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुचरणांची पूजा करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्तच्या सोहळ्यात गुरुचरणांचे दर्शन होणे आणि परात्पर गुरुदेव हीच आपली गुरुमाऊली आहे, असे वाटणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्तच्या सोहळ्यात गुरुचरणांचे दर्शन झाले. सकाळी परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून माझ्यामध्ये हाच भाव निर्माण करून परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासह गुरुचरणांची पूजा करवून घेतली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात सांगितले, परात्पर गुरुदेव हीच आपली गुरुमाऊली आहे. तेव्हा वाटले, परात्पर गुरुदेवांनी गुरुमाऊली बनून मला मांडीवर बसवले आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला, घाबरू नको. मी सदैव तुम्हा सर्वांच्या समवेत आहे.
६ ई. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने घरातूनच कार्यालयाचे काम व्यवस्थित चालू होणे आणि परात्पर गुरुदेव प्रत्येक क्षणी आम्हा सर्वांची काळजी घेत आहेत, असे वाटणे : परात्पर गुरुदेवांच्या कृपेने घरातूनच कार्यालयाचे काम व्यवस्थित चालू झाले. माझ्या प्रकृतीतही सुधारणा झाली. पूर्वी मला रात्रभर झोप यायची नाही. आता झोपतांना नामजप केल्यावर मी आश्रमातच झोपलो आहे, असे मला वाटते. परात्पर गुरुदेव प्रत्येक क्षणी आम्हा सर्वांची काळजी घेत आहेत, असे मला वाटते. दळणवळण बंदीमध्ये बाहेरचे व्यवहार बंद आहेत; परंतु परात्पर गुरुदेवांनी माझ्या अंतर्मनातील सर्व कुलुपे उघडली आहेत. त्यांच्या चरणी शतशः प्रणाम ! कृतज्ञता !
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |