उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत साधारणपणे एका रेषेत असलेली ७ शिवमंदिरे, हा प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना !
भारतात अशी ७ शिवमंदिरे आहेत जी उत्तर भारतातील श्री केदारनाथ मंदिरापासून ते दक्षिण भारतातील श्री रामेश्वरम् मंदिरापर्यंत एका सरळ रेषेत असलेली आढळतात. यामध्ये
१. उत्तराखंडमधील श्री केदारनाथ मंदिर
२. तेलंगाणामधील श्री कालेश्वरम् मंदिर
३. आंध्रप्रदेशमधील श्री कालहस्ती मंदिर
४. तमिळनाडूमधील कांचीपुरम् येथील श्री एकाम्बरेश्वर मंदिर
५. तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाई येथील श्री अन्नमलाइयर मंदिर
६. तमिळनाडूमधील चिदंबरम् येथील श्री थिल्लाई नटराज मंदिर
७. तमिळनाडूतील जगप्रसिद्ध श्री रामेश्वरम् मंदिर
ही सर्व शिवमंदिरे एकमेकांपासून शेकडो ते सहस्रो कि.मी. दूर असूनही भौगोलिकदृष्ट्या ती 79E 4154 रेखांश सरळ रेषेत आहेत. त्या काळी, म्हणजे सहस्रो वर्षांपूर्वी हल्लीच्या सॅटेलाईटसारखे (उपग्रहासारखे) कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना या मंदिरांची अशा प्रकारे रचना असणे, हा खरोखरच भारतातील प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना म्हणावा लागेल.
(साभार व्हॉट्सअॅप)