राजस्थानमध्ये श्री महादेव मंदिराच्या ७५ वर्षीय सेवेकर्याची निर्घृण हत्या
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे आणि सेवेकरी असुरक्षित ! एखाद्या मशिदीचा इमाम किंवा चर्चचा पाद्री यांच्याविषयी अशी घटना घडली असती, तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र येथे हिंदूची हत्या झाल्याने सारे काही शांत आहे !
जयपूर (राजस्थान) – येथे मेहरा समाजाच्या राकेश्वर महादेव मंदिरातील ७५ वर्षीय वृद्ध सेवेकरी गिरीराज मेहरा याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
राजस्थान में महादेव मंदिर के 75 वर्षीय सेवादार की हत्या: हाथ-पाँव रस्सी से बँधे, मुँह में ठूँस डाला था कपड़ा#Rajasthan #Murder #Temple https://t.co/m6mdOzXLOT
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 27, 2021
त्याच्या तोंडात कापड कोंबण्यात आले आणि हात अन् पाय बांधण्यात आले होते. २६ जानेवारीला सकाळी काही महिला मंदिरात पुजेसाठी गेल्या असता ही घटना लक्षात आली. पोलिसांचा तर्क आहे की, मंदिराच्या शेजारी काही मद्यपी येऊन बसतात. त्यांच्याशी गिरीराज मेहरा यांचा वाद झाल्याने त्यांच्याकडून ही हत्या झाल्याची शक्यता आहे.