देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी २६ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद
केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
नवी देहली – देहलीतील हिंसाचारावरून देहली पोलिसांनी शेतकरी नेत्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. यात राकेश टिकैत, सरवनसिंह पंढेर, सतनामसिंह पन्नू यांच्यासह योगेंद्र यादव, पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू अन् लखबीरसिंह उपाख्य लख्खा सिधाना यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २६ जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात आरोप करण्यात आला आहे की, ट्रॅक्टर रॅलीसाठी घालून दिलेल्या अटींचे यांच्याकडून पालन करण्यात आले नाही.
#FarmersProtest #TractorParade #TractorRally
‘No one will be spared’: @DelhiPolice top cop names #SatnamSinghPannu, #RakeshTikait and #DarshanPal for violation of tractor parade termshttps://t.co/lInKOQcxof @anshumalini3— The Tribune (@thetribunechd) January 27, 2021
Red Fort attack: Dear ‘liberals’, here is how a little understanding of physics can help youhttps://t.co/dfz1792aE2
— OpIndia.com (@OpIndia_com) January 28, 2021
(सौजन्य : Dilli Tak)
गुन्हे नोंदवण्यात आलेल्या नेत्यांची नावे
नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, ‘स्वराज इंडिया’चे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंह संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंह, कवणलप्रीतसिंह पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंह फूल, जोगिंदरसिंह हरमीतसिंह कादियन, बलवीरसिंह राजेवाल, सतनामसिंह साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंह मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंह भेरू, बुटासिंह शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंह नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंह, प्रेमसिंह गहलोत यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्रांचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण १३ कलमांच्या अंर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.