देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० पोलीस घायाळ !
|
|
नवी दिल्ली – राजधानीत प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने शेतकर्यांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस घायाळ झाले. लाल किल्ला, आयटीओ, नांगलौई आदी परिसरात झालेल्या हिंसाचारात हे पोलीस घायाळ झाले आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीसदलाच्या गुन्हे शाखा आणि विशेष शाखा यांना सोपवण्यात आले आहे.
(सौजन्य : वनइंडिया हिन्दी)
१. हिंसाचारात घायाळ झालेल्या पोलिसांमध्ये उत्तर देहलीतील ४१, पूर्व देहलीतील ३४, पश्चिम देहलीतील २७, द्वारका येथील ३२, देहली बाहेरील जिल्ह्यांतील ७५ पोलिसांचा समावेश आहे.
२. या हिंसाचारानंतर राजधानीत सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून देहली पोलिसांसमवेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
३. या प्रकरणात पोलिसांनी २२ जणांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवला आहे.
(सौजन्य : Zee News)
४. हा हिंसाचार घडवून आणण्यासाठी ज्यांनी जमावाला चिथावले, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हिंसाचार घडवून आणणार्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीतील छायाचित्रणाचा अभ्यास करत आहेत.
५. यासाठी लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेर्यांमधील छायाचित्रणाचा अभ्यास करण्यासाठी गुन्हे शाखा आणि विशेष शाखा यांच्या पोलिसांचे साहाय्य घेण्यात येणार आहे.