सर्वांसाठी लवकरच लोकल सेवा चालू करू – मुख्यमंत्री
मुंबई – लोकल रेल्वेसेवा सर्वांसाठी चालू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आढावा घेण्यात आला. लोकल सेवा चालू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली.
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे चालू करता येईल, या दृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा मासांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मार्च मासात दळणवळण बंदी लागू करण्यात आल्यापासून मुंबईतील उनपनगरीय लोकलसेवा बंद करण्यात आली.