पाळी (गोवा) येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज गवळण काला
देऊळवाडा, पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानच्या कालोत्सवाला २६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. २७ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता च्यारी बंधू दऊळवाडा यांच्या वतीने गवळण काला होणार आहे. त्यानंतर रात्री १०.३० वाजता श्री नवदुर्गा हौशी महिला नाट्यमंडळ पाळी यांच्या वतीने संगीत मदलसा हे नाटक सादर केले जाणार आहे.