कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी
वणी (यवतमाळ), २६ जानेवारी (वार्ता.) – येथील परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचे खाण अधिकार्यांशी हितसंबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे. कृत्रिम जंगलांमुळे वन्य प्राणी हे शेतीचा विध्वंस करत आहेत. वाघांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे.