नगरसेवक युवराज बावडेकर यांचे गटनेता आणि सभागृह नेते पदाचे त्यागपत्र
सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह आणि गटनेते युवराज बावडेकर यांनी पक्षाचा आदेश प्राप्त झाल्याने दोन्हींचे त्यागपत्र दिले. हे त्यागपत्र बावडेकर यांनी महापालिका जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे सोपवले. या वेळी भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार उपस्थित होते. या वेळी युवराज बावडेकर म्हणाले, ‘‘अडीच वर्षे संधी दिल्याविषयी पक्ष आणि सर्व नेते यांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढे पक्ष जे दायित्व देईल, ते प्रामाणिपणे पार पाडेन.’’