नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या
धर्म लपवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्यांच्या विरोधात पोलीसही विशेष काही करत नाहीत; मात्र दुसरीकडे हिंदु तरुणाने खोटेपणा न करता प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील सेक्टर ३८ मध्ये राधे चौहान या हिंदु तरुणाची हत्या केल्याच्या प्रकरणी त्याची सासू साबिरा आणि मेहुणा जावेद यांना पोलिसांनी अटक केली आहे. राधे चौहान याने ६ मासांपूर्वी साबिरा हिच्या शहनाज या मुलीशी विवाह केला होता.
थाना सेक्टर-39 नोएडा क्षेत्रान्तर्गत मिले एक व्यक्ति के शव के सम्बंध में @DCP_Noida द्वारा दी गयी बाइट। @Uppolice pic.twitter.com/s3DsZDcwCQ
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) January 12, 2021
यामुळे राधे याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती; मात्र जावेद याने दावा केला की, राधे याने त्याच्या लहान बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याने त्याची हत्या केली. (राधे चौहान हा हिंदु असल्याने त्याची हत्या करण्यात आली, हेच लक्षात येते; मात्र त्याला वेगळे वळण देण्याचाच प्रयत्न जावेद याने केला आहे, असे दिसून येते ! – संपादक)