पाकिस्तानच्या साहाय्याने तुर्कस्तान अणूबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात ! – ग्रीसच्या विशेषज्ञांची भारताला चेतावणी
पाक, तुर्कस्तान आणि चीन जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण करत आहेत अस्थिरता !
पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?
अथेन्स (ग्रीस) – पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांच्यातील वाढत्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर ग्रीसच्या विशेषज्ञांनी भारताला चेतावणी दिली आहे की, पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबॉम्ब आणि क्षेपणास्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान तुर्कस्तानला देत आहे.
१. ग्रीसचे आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे विशेषज्ञ प्रा. सर जॉन नोमिकोस यांनी एका वेबिनारमध्ये बोलतांना म्हटले की, पाक आणि तुर्कस्तान यांच्यातील युती भारताला धोकादायक बनली आहे. तुर्कस्तान, पाक आणि चीन यांच्या गुप्तचर यंत्रणा जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. तुर्कस्तान आणि पाक यांच्यावर लगाम घालण्यासाठी भारताने भूमध्य सागरामध्ये त्याचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे.
Turkey-Pakistan nexus is immediate terrorist threat to India, Greece: Experts https://t.co/wDWKcMKCsI
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 23, 2021
२. प्रा. नोमिकोस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आवाहन केले की, त्यांनी तुर्कस्तानकडून अण्वस्त्र संपन्न देश होण्याच्या प्रयत्नांना लगाम घालावा.