‘साधक’ आणि ‘साधना’ यांचा सौ. मीना खळतकर यांना उमगलेला अर्थ !
१. गुरुमाऊलीला साधक म्हणजे जीव कि प्राण आहेत, या वाक्याची मला आठवण झाली. त्या वेळी मला साधक आणि साधना या दोन शब्दांतील प्रत्येक अक्षरामध्ये किती सामर्थ्य आहे ! प्रत्येक अक्षर किती अर्थपूर्ण आहे !, असे वाटून प्रत्येक अक्षराचा अर्थ माझ्या मुखातून बाहेर पडू लागला.
सा – साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असलेला
साखरेसारखी मधुर वाणी असणारा
सामंजस्य असणारा
साधनेची गोडी असलेला
साधकत्व अंगी असलेला
सातत्याने ईश्वराच्या अनुसंधानात असणारा
साधना गुरुदेवांना अपेक्षित अशी करणारा
सातत्याने ईश्वरप्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करणारा
साधनेचा प्रसार देशाच्या कानाकोपर्यात जाऊन ऊन, थंडी आणि पाऊस यांचा विचार न करता करणारा
सामर्थ्यशाली
ध – धनाची आसक्ती नसलेला
धर्माचरण स्वत: करून इतरांना धर्मशिक्षणासाठी उद्युक्त करणारा
धर्मांधांच्या विरोधात लढा देणारा
धर्मद्रोह्यांच्या हृदयांत धडकी भरेल, असे व्यासपिठावरून बोलणारा
धगधगत्या अग्नीप्रमाणे पेटून अन्यायाविरुद्ध क्षात्रवृत्तीने आवाज उठवणारा
धरतीमातेप्रमाणे सर्वांना स्वतःमध्ये सामावून घेणारा, म्हणजे सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारा
क – कष्टाने स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणारा
कष्ट घेण्याची सिद्धता असणारा सेवा करतांना शारीरिक
कर्तव्यपूर्ती करून ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणारा
कल्याणासाठी समाजाच्या झटणारा
कौशल्ये अनेक अंगी असणारा
असे गुण असणारे आदर्श साधक सर्वांना हवेहवेसे वाटतात. असे साधक म्हणजे चैतन्याचे लहान लहान गोळेच आहेत. त्यामुळे समाजातील लोकही त्यांची आतुरतेने वाट पहातात.
प्रार्थना : गुरुमाऊलीला प्राणाहून प्रिय असणारे साधक खरोखरच भाग्यवान आहेत. आम्हाला साधकरूपी भगवंताशी, म्हणजेच गुरुमाऊलीच्या समष्टी रूपाशी एकरूप होता येऊ दे. आम्हाला प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पहाता येऊ दे, अशी गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने कळकळीची प्रार्थना आहे. मला अशा साधकांच्या सहवासात ठेवले, यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. साधना जाणून घेऊन भगवंताच्या नामस्मरणाचा साठा करणे, हेच खरे धन !
सा – साठा (संचय) करणे
ध – धन
ना – भगवंताच्या नामाचे स्मरण
साधना जाणून घेऊन भगवंताच्या नामस्मरणाचा साठा करणे, हेच खरे धन आहे. दु:खी जिवाला आनंद देते, ती साधना !
हे भगवंता, आम्हाला साधनेची अवीट गोडी चाखता येऊ दे. त्यातील आनंद घेता येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. गुरुमाऊली, तुम्ही आमच्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःखे यांना सामोरे जाण्यासाठी सुलभ अन् सोपी साधना शिकवून ती करवूनही घेत आहात, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.२.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |