लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।
जन्मभर जन भ्रष्टाचार अन् वशिल्याने त्रासती ।
धर्माचरण नि साधना करण्या विसरती ॥ १ ॥
शाळेमध्ये प्रवेश घेण्या वशिला लावती ।
सरस्वतीमातेचा आशीर्वाद घेण्या लाजती ॥ २ ॥
नोकरी-व्यवसायात वशिला लावती ।
धर्माने नि नीतीने वागण्या विसरती ॥ ३ ॥
लोकप्रतिनिधी होण्यास वशिला लावती ।
सत्तेवर येऊनी जनतेकडून पैसे उकळती ॥ ४ ॥
वशिला लावूनी सत्ता नि पदे मिळवती ।
जनता-जनार्दनाचे भले करण्या विसरती ॥ ५ ॥
जीव वाचवण्या देवाकडेही वशिला लावती ।
अंती चित्रगुप्त पाप-पुण्याचा हिशोब करतसे ॥ ६ ॥
भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥ ७ ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥ ८ ॥
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |