ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणा
सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
सांगोला (जिल्हा सोलापूर), २५ जानेवारी (वार्ता.) – देवतांचा वेगवेगळ्या माध्यमातून सर्रास होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन सांगोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नावे तहसीलदार अभिजीत पाटील यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटणे आणि श्री. विनोद गायकवाड उपस्थित होते. या निवेदनावर सर्वश्री अक्षय क्षीरसागर, सागर माळी, अविनाश बनसोडे, अविनाश शिंगाडे यांसह अन्य धर्मप्रेमींच्या स्वाक्षर्या आहेत.