कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ।
रामनाथी असे साक्षात् भूलोकीचे वैकुंठ ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥ १ ॥
लहानाचे मोठे केले मला या आश्रमाने ।
साधना शिकवली येथील प्रत्येक साधकाने ॥ २ ॥
गुरुकुलात लाभले प्रत्यक्ष शिक्षक-संत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥ ३ ॥
सहा वर्षांत प्रत्येकाचे गुणदर्शन तू दाखवले ।
ते आत्मसात करण्या प्रभु न्यून मी रे पडले ॥ ४ ॥
तरी शिकवले प्रयत्नाने स्वभावदोषांचा करण्या अंत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥ ५ ॥
साक्षात् श्रीमन्नारायण गुरुरूपी लाभले (टीप १) ।
मातीच्या गोळ्याला प्रत्यक्ष सद्गुरु (टीप २) घडवती ॥ ६ ॥
त्यांच्या प्रीतीचा सदा अनुभवते हा गंध ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥ ७ ॥
लागू दे अखंड त्यांच्या स्मरणाचा मज छंद ।
असाच कृतज्ञतेसाठी दाटो सदा हा कंठ ॥ ८ ॥
टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, खरे पहाता मी तुम्हाला अपेक्षित असे करण्यास न्यून पडते; पण तुम्हीच या समष्टी भावाच्या मार्गावरून माझे बोट धरून मला चालायला शिकवा, इतकीच या वेड्या मुलीची प्रार्थना !
– कु. वैष्णवी जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०१६)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |