(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’
राहुल गांधी यांच्याकडून रा.स्व. संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका
केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !
चेन्नई (तमिळनाडू) – आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. मोदी यांना हे समजत नाही की, तमिळनाडूचे भविष्य केवळ तमिळ जनताच ठरवू शकते. नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, अशा असभ्य भाषेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी धारमपूर येथील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. तमिळनाडूमध्ये मे मासात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.